मंद्र—- भाग दोन

ऑगस्ट 22, 2009

मंद्र – मुळ कन्नड लेखक – डॉ भैरप्पा

मराठी अनुवाद – उमा कुलकर्णी

त्या कादंबरीतील एक वाक्य कथेचं सारांश सांगतं,

“पण कलाकाराच्या अंतरंगात डोकावलं तर तिथं वेगळंच असतं. का हा विरोधाभास?”

संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांबद्दल आधीपासूनंच जी समजूत आहे ती या कादंबरीमुळे नक्कीच खरी ठरेल. (अर्थात, आजकाल ही समजूत बदलत चालली आहे, पण तरीही थोडा वेळ लागणार). कदंबरीत कुठल्याही ठिकाणी हिडिसपणा दिसत नाही. उलट, फार सुंदर शैलीत लेखाने प्रत्येक भावनेचं, प्रत्येक विचाराचं शब्दांकन केलंय. आपल्या मुलीच्या वयाच्या शिष्येकडे जरी तो आकर्षित झाला असला, तरी तिच्याकडे पाहताना त्याच्यातला कलाकारंच त्याची द्रुष्टी घडवत होता. एखादीचा साधेपणा त्याला “यमन” रागासारखा वाटला, तर दुसरीचं स्मित त्याला “भूपाली” रागाची आठवण करून देतं. कामभावनेला उत्तेजीत करणारे हिचे स्तन त्याला या रागाची आठवण करून देतात, तर तिची नाजूक कंबर त्याला त्या रागाची आठवण करून देतात… नुसतंच वासनेने स्त्री देहाकडे ना पाहता, तो त्या स्त्रियांमधे एकेक राग शोधत आहे, हे दिसल्यामुळेच त्याचं “जस्टीफिकेशन” आपल्याला पटत असावं. अर्थात, यात कौशल्य लेखकाचं, यात वादंच नाही….

“कलाकार” ही एक वेगळीच जमात. त्यांच्यालेखी समाज व्यवस्था, समाजाचे नियम ह्यांचे काहीही महत्व नाही. हेच लेखकाने पटवून दिले आहे. आता ते मान्य करणं अथवा न करणं हे केवळ वाचकांच्या द्रुष्टीकोनावर अवलंबून आहे.

मंद्र

ऑगस्ट 22, 2009

मुळ कन्नड लेखक – डॉ भैरप्पा

मराठी अनुवाद – उमा कुलकर्णी

भारतात आजही शास्त्रीय संगिताकडे आदराने पाहिलं जातं. एक अफ़ाट सामर्थ्य लाभलेला कलाकार लाखो रसिकांच्या, जाणकारांच्या मनांवर आपल्या प्रतिभेच्या जोरावर सहज ताबा मिळवु शकतो पण स्वतःच्या वासने समोर मात्र हतबल होतो भरकटत जातो. शास्त्रीय गायनात आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा कायमच श्रेष्ठ आणि पवित्र मानली गेलेली आहे पण त्यातही काळी बाजु आहेच. कदाचित अभावानेच दिसणारी ही काळी बाजु दाखवायचा प्रयत्न लेखकाने केला आहे.

आपल्या कडे असलेलं सर्वोत्तम ज्ञान आपल्या शिष्येला देण्याच्या बदल्यात तिच्याकडुन तिचं पावित्र्य मागितलं जातं, गाण्याबद्दल असलेल्या पराकोटीच्या आकर्षणातुन तीही तयार होते, गाणंही शिकते पण त्याच्यातला “सामान्य माणुस” इथेच थांबत नाही, वासनेच्या वादळात भरकटत राहतो एक वेळ अशी येते की त्याचं अस्तित्वच पणाला लागतं आणि त्याच्यातला कलाकार पुन्हा जागा होतो,पुन्हा त्याची अस्मिता जागी होते, स्वतःच्या नाकर्तेपणाला लाथ मारुन कष्टाने पुन्हा अजुन उंच शिखर गाठतो.

एका क्षणी अःतर्मुख होतो, पश्चातापाची कबुली न देता, स्वतःचा अहंकार जपुनच उपभोगलेल्या, वापरलेल्या सर्व स्त्रीयांची समजुत काढायचा प्रयत्न करतो, अगदी पैशांचीही लालुच दाखवतो पण वेळ निघुन गेल्याचं जाणवल्यावर मात्र निराश, हतबल होतो.

काही वेळा तडजोड म्हणुन काही वेळा खरोखरच्या प्रेमातुन तर काही वेळा निव्वळ त्याची सेवा म्हणुन स्त्रीयांनी केलेलं समर्पण दाखवताना कुठेही हिडीसपणा न येता खुप साधारण शब्दात त्या त्या प्रसंगाचं वर्णन येतं आणि त्या मागचा उद्देश किंवा नायकाचं “जस्टीफ़िकेशन” आपल्याला आतुन पटलं नाही तरी आपण स्वीकारतो.

कादंबरीतील व्यक्तीरेखा काल्पनिक असल्या तरी त्या त्या क्षेत्राचं प्रतिनिधीत्व करतात.

कितीही मोठा असला तरी प्रत्येक कलाकार आतुन एक माणुसच असतो हे मात्र संपुर्ण कादंबरी वाचताना पुन्हा पुन्हा जाणवत राहतं.

सांग मला…

मार्च 24, 2009

कधीतरी माझे श्वास ऎक,
प्रत्येक उच्छ्वासाला तुझंच नाव घेतात ते!
कधीतरी माझ्या एकांताला भेट,
तू जितका स्वतःचा नसशील ,
तितका माझ्या एकांताचा झाला आहेस!
कधीतरी माझे ह्रदयकंप ऎक,
तुझ्याच ह्र्दयकंपाचा नाद ऎकू येईल तुला!
कधीतरी माझ्या डोळ्यांत बघ,
तुझंच रूप दिसेल तुला!
कधीतरी हातात हात घे माझा,
तुझ्या स्पर्शासाठी आतुर या शरीराने,
तुला नाही गारठवलं, तर सांग मला!
कधीतरी माझ्याकडे प्रेमाने बघ,
त्या एका द्रुष्टिक्शेपाने तुला,
माझ्या प्रेमात नाही पाडलं,तर सांग मला!

———————

kavita… grace chya…

फेब्रुवारी 18, 2009

भय इथले संपत नाही…मज तुझी आठवण येते…
मी संध्याकाळी गातो…तू मला शिकविली गीते…

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

-grace…

kuni mala hya olincha artha sangel ka???

Follow

Get every new post delivered to your Inbox.